अंजनेय पर्वत यात्रा
कर्नाटक राज्यामध्ये हम्पी या प्राचीन शहराच्या जवळ अंजनेय या नावाचा प्राचीन पर्वत आहे.
या ठिकाणी हनुमंताचा जन्म झाला असं सांगितलं जातं आहे.
अंजनी पर्वत या नावाने हा प्रदेश ओळखला जातो या ठिकाणी जाण्याचा नुकताच योग आला आणि अंजनी पर्वत हम्पी असा परिसर पाहण्यासाठी आम्ही २८ ऑगस्ट २३ रोजी निघालो होतो आमच्या सोबत आमचे मित्र इंजिनिअर सुनील पोरे पोपट बनसोडे राजू पोरे महेश कांबळे असे पाच जण या यात्रेसाठी निघालो.
सकाळी नऊ वाजता म्हसवड- येथून कार ने प्रवास सुरू केला.
सांगोला जत विजापूर मार्गे आम्ही सायंकाळी पाच वाजता गंगा नगर या ठिकाणी पोचलो गंगा नगर या परिसरातील मोठे शहर आहे .
या शहराच्या जवळच रॉयल पॅलेस हॉटेल हे अतिशय सुंदर असं पंचतारांकित हॉटेल आहे या हॉटेलमध्ये आम्ही मुक्कामासाठी रुम केलेल्या होत्या आणि आम्ही या ठिकाणी पोहोचलो.
रात्रीचं छान पैकी जेवण घेतलं हॉटेलमध्ये अतिशय चांगली सुंदर स्वच्छ अशी व्यवस्था होती या हॉटेलमध्ये राहण्यासाठी उत्तम अशा रूम आहे.
सकाळी लवकर उठून आम्ही अंजनी पर्वत या ठिकाणी जाण्यासाठी निघालो हम्पी शहरापासून जवळच असणाऱ्या अंजनी पर्वताच्या ठिकाणी जाण्यासाठी साधारण एक तास लागतो यामध्ये 21 किलोमीटरचा अंतर आहे हे 21 किलोमीटर अंतर निसर्गरम्य अशा परिसरात आहे.
दोन्ही बाजूंना असणारी सुंदर झाडी आणि मध्ये असणारे वळणदार रस्ते कोकणातला अनुभव यावा अशा पद्धतीचे आहेत
अंजनी पर्वताच्या खाली पार्किंग व्यवस्था असून या पार्किंग व्यवस्थेमध्ये कार पार्क केली.
साधारण साडेनऊशे पायऱ्या या मंदिरात जाण्यासाठी आहेत.
११ वाजता आम्ही चालण्यास सुरुवात केली पायऱ्यावरून जात साधारण दीड तासांमध्ये हे अंतर आणि पार केलं साडे बारा वाजले.
हनुमंताच्या डोंगर माथ्यावर परिसराचा मंदिर आहे .
डोंगर आहे हा डोंगर दिसायला निसर्गरम्य असून वरून नयन मनोहर असे दृश्य पाहायला मिळतात.
या दिवशी पोर्णिमा असल्यामुळे हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी खूप मोठे गर्दी होते.
अनेक वृद्ध भाविक लोक हा डोंगर चढून जात असतात.
डोंगरावरील पायऱ्या दोन्ही बाजूला असणारी जाळी संरक्षण कठडे इथल्या देवस्थान समितीने अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली असून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे.
डोंगर माथ्यावर असणारा प्राचीन असं हनुमंताचे मंदिर या मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून मंदिरात आम्ही प्रवेश केला भव्य असे हनुमंताची मूर्ती मंत्रघोषात इथले पुजारी देवाची पूजा करत होते भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही हनुमंताचे दर्शन घेतलं .
थोड्या वेळ गाभाऱ्यामध्ये बसून हनुमान चालीसा पठण करून आधी या परिसर पाहून घेतला मंदिरावर प्रसादाची सोय आहे मात्र आम्ही प्रसादासाठी न थांबता थोडा वेळ हा परिसर पाहून नंतर हळूहळू खाली उतरलो .
रस्त्यामध्ये अनेक भाविक भेटले. डोंगर परिसरात मोठमोठाले दगड आणि त्यातून वाहणारे पाणी निसर्गाची गाणी म्हणणारे झरे आणि या झाडं खळखळून वाहणाऱ्या ओढा. वाहणारे पाणी संगीताची आरंगी वेगळी साथ देत होती उंच असे वृक्ष आणि या वृक्षावर किलबिल करनारे पशुपक्षी अतिशय अप्रतिम असे हे दृश्य नक्कीच माणसाच्या मनाला मोहनी घालतात.
खाली आल्यानंतर थोडं दमल्यासारखे झाल्यामुळे शहाळे पिऊन आम्ही एनर्जी तयार केली.
आणि हम्पी साठी जायला निघालो रस्त्यातच वीरभद्राचचे प्राचीन असे मंदिर आहे.
जवळच पंपा सरोवर आहे.इतर ही खूप मंदिर आहे.
राजा सुग्रीव यांचे हे नगर असून याला किश्किंधा असे म्हणतात.
राष्ट्रकूट राजाची नगरी आणि विजय नगर देवनगिरी राजाचे वंशज असणाऱ्या राजाने हे मंदिर बांधले आहे. दगडी खांबावर विशेष कालकृती आहे आणि हे मंदिर बांधले असून विजय देवराय देवगिरीचे साम्राज्य असणाऱ्या या राजाचा राज्याभिषेक या मंदिरामध्ये झाला होता .
अशी आख्यायिका येथे सांगण्यात येते प्रचंड असं सभामंडप असणार हे मंदिर जवळजवळ दहा एकरामध्ये पसरलेले आहे .
मंदिराचा परिसर पूर्ण पाषाणांमध्ये बनवलेला असून शंभर फुटाचा मोठा प्रवेश कमाण असून ह्या प्रवेश कमानी मधून प्रवेश केल्यानंतर आणखी तीन कमानी आत मध्ये आहेत.
प्रचंड सुंदर असा हा मंदिराचा परिसर असून मंदिरामध्ये लक्ष्मी, सरस्वती, शंकर वीरभद्र, महाकाली दुर्गादेवी ,अशी छोटी छोटी मंदिरे असून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्राचीन अशी शंकराची पिंड आहे.
या पिंडीला दररोज अभिषेक केला जातो या वीरभद्रेश्वराचे दर्शन आम्ही घेतलं आणि दर्शन घेऊन बाहेर रस्त्यात जाताना जवळ नरसिंह मंदिर असून प्राचीन अवशेष या मंदिराचे रस्त्यावरून दिसत असतात प्रचंड मोठी देवालय या परिसरामध्ये असून छोटी मोठी सुमारे वीस पंचवीस देवालये या परिसरामध्ये आहेत .
या देवालयाचा परिसर पाहून घेतला अखंड पाषाणांमध्ये बनवलेली ५० फूट उंचीची नरसिंहाची मूर्ती नजर वेधून घेते. या मूर्तीला पाहण्यासाठी परदेशी पर्यटन देखील येत असतात.
काही परदेशी पर्यटन तिथे आलेले होते.
जवळच पर्यटन विभागाचे केंद्र असून इथून हंपी शहर परिसर पाहण्यासाठी इलेक्ट्रिक कार उपलब्ध असून प्रति माणसी 20 रुपये याप्रमाणे आकारणी केली जाते.
हम्पी येते सूर्याचा रथ असून हा सूर्याचा रथ एका विशिष्ट दगडा मध्ये बनवलेला असून अनेक दगड एकत्र करून हा रथ बनवलेला आहे.
इथूनच जवळ विठ्ठलाचे प्राचीन मंदिर असून या मंदिरामध्ये मूर्ती मात्र नाही येथील मूर्ती पंढरपूर येथे नेली आहे असे सांगितले जाते.
परदेशी आक्रमणामुळे पंढरपूर येथे ठेवण्यात आली असे सांगण्यात येते.
अनेक प्रकारची लेणी या मंदिराच्या परिसरामध्ये असून मंदिरासमोर राजवाडा आहे.
या राजवाडा मध्ये असणाऱे अवशेष आज देखील भंग्नावस्तीमध्ये आहेत प्राचीन संस्कृतीचा नजराणा जतन करून भारतीय परंपरेचा इतिहास सांगणारे हे परिसराचं गाव म्हणजे प्राचीन बाजारपेठ येथे असणारे विविध प्रकारच्या आकृत्या पाषाणांमध्ये कोरलेल्या मूर्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात
आलेल्या पर्यटकांना हा परिसर इतिहास मध्ये घेऊन जातो इथले दगड इतिहासाची साक्ष देत असतात.
प्राचीन काळाचे वैभव आणि इतिहासाची साक्ष देणारे ही मंदिर भारतीय इतिहासातील जिवंत साक्ष आहेत.
या परिसरात गेल्यानंतर प्राचीन काळाच्या लोकजीवनाचा इतिहास डोळ्यात साठवताना भारतीय संस्कृती व भारतीय संस्कृतीतील असणारे वैविधता विविधता पाहण्यास मिळत असते.
हा सगळा परिसर पाहून आम्ही पुन्हा मंदिराच्या आसपास असणाऱ्या लेणी पाहून रात्री हॉटेलवर मुक्कामासाठी आलो या हॉटेलमध्ये जेवण करून शांतपणे झोप घेतली.
आणि सकाळी आम्ही गाणगापूर येथे जाण्यासाठी प्रस्थान केले सायंकाळी चार वाजता गाणगापूर येथे पोहोचलो श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन घेऊन पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला.
ConversionConversion EmoticonEmoticon