महाशिवरात्री महात्म्य

महाशिवरात्री


महाशिवरात्री हा हिंदूंचा एक सण आहे. जो माघ चतुर्दशी या तिथीला साजरा केला जातो. हा सण यावर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्त उपवास ठेवतात व भगवान शिव शंकराची आराधना करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिर फुलांनी सजविले जाते. मोठ्या संख्येने शिवभक्त मंदिरात शिवाचे दर्शन व पूजन करतात. बेलाची पाने, दूध, पांढरी फुले वाहतात व शिवलिंगाची पूजा केली जाते. "ॐ नमः शिवाय " या  मंत्राचा जप केला जातो.

महाशिवरात्री संबंधित खूप कथा आहेत त्यापैकी एका कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी विषही निर्माण झाले होते. या विषाच्या प्रभावापासून वाचविण्याकरिता भगवान शंकरांनी स्वतःच हे विष प्राशन केले व त्यांनी हे विष आपल्या कंठात ठेवले ते विष शक्तिशाली होते व भगवान शंकरांना त्यामुळे वेदना होत होत्या म्हणून चिकित्सकांनी देवांना सल्ला दिला कि शिव शंकरांना रात्रभर जागे ठेवा. भगवान शंकरांना जागे ठेवण्यासाठी त्यांनी म्हणजेच देव देवतांनी संगीत वाजवले नृत्य केले . सकाळपर्यंत शिव त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला. महाशिवरात्री हा उत्सव या घटनेचे प्रतिनिधित्व करणारा उत्सव आहे. म्हणून महाशिवरात्रीला भगवान शिव शंकर यांची मोठी पूजा केली जाते. भक्तगण शिवमंदिरात मोठे कार्यक्रम आयोजित करून भाविकांना शिवरात्रीचे महत्व पटवून देतात.


ग्रीष्मा  शिंदे
Previous
Next Post »

अंजनेय पर्वत. किश्किंदा दर्शन

अंजनेय पर्वत  यात्रा कर्नाटक राज्यामध्ये हम्पी या प्राचीन शहराच्या जवळ अंजनेय या नावाचा प्राचीन पर्वत आहे.  या ठिकाणी हनुमंताचा जन्म झाला अस...