क्षेत्र शिखर शिंगणापूर


क्षेत्र शिखर शिंगणापूर.
महाराष्ट्राचे कुलदैवत।
शिवरायांचे मुख्य दैवत.
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. ते फलटणच्या आग्नेयेस ३७ किमी.एवढ्या अंतरावर आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर आहे.मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
शिंगणराजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे या मंदिराला शिंगणापूर या नावाने ओळखले जाते.
शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासून ते चैत्र पोर्णिमेपर्यंत असते. चैत्र शु. अष्टमीला शंकर व पार्वती यांच्या विवाह हा मुख्य सोहळ्यांपैकी एक असतो. तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून (हळकुंड ) हळद जात्यावर दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वऱ्हाडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पर्वतीमातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचे शिखर(कळस) बांधून ते श्री अमृतेश्वर (बळी ) मंदिराचे शिखर(कळस ) यांना पागोटे (सुताची जाड दोरी) बांधले जाते. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी ५५० फूट लांब पागोटे विणले जाते. यांस शंभु महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. आणि रात्री १२ वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभू महादेव आणि पार्वतीमातेचा विवाह सोहळा “हर हर हर महादेव” च्या जयघोषात पार पडतो. चैत्र शुद्ध एकादशीस इंदूरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत.
या परिसरात अष्टलिंग आहेत. सह्याद्रीपठारावर वरील निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर आहे.
येथे महाराष्ट्र पर्यटन विकास मंहामंडाळाचे रेस्ट हाऊस आहे. भाविकांना रहाण्याची सोय येथील पुजारी करतात. धार्मिक विधी अल्प मोबदल्यात करून प्रसाद देतात.

अतिशय नम्रपणे सेवाभावी पुजारी आहेत.

या परिसरात काही अडचण आल्यास.
विजयराव टाकणे.9921494998.
एडमीन, दत्त परीवार. संपर्क साधावा.
Previous
Next Post »

अंजनेय पर्वत. किश्किंदा दर्शन

अंजनेय पर्वत  यात्रा कर्नाटक राज्यामध्ये हम्पी या प्राचीन शहराच्या जवळ अंजनेय या नावाचा प्राचीन पर्वत आहे.  या ठिकाणी हनुमंताचा जन्म झाला अस...