भैरव उपासना.


आज माहिती घेऊया सर्व परीचीत असलेले दैवत ज्यांना तंत्रात संरक्षक मानले जाते ,
आणि अनेक साधकांन चे आराध्य व ईष्ट दैवत असलेले भैरव साधने बद्दल .
जीवनात भैरव साधनेची उपयोगिता काय ?,महत्ता काय ? आध्यात्मिक अर्थ काय?आणि भैरव तत्व कसे कार्य करते  ते जाणून घेऊया
ओम तीक्ष्णदन्त महाकाय कल्पांत दहणोपम,
भैरवाय नमस्तुभय्म अनुज्ञांम दातुर्मरहसी।
भैरव तत्व हे सहायक तत्व आहे. जीवनात भैरव तत्व खूप उपयोगी असते. भैरवतत्व विना एकटं कोणी कार्य करू शकत नाही.
भैरव तत्वाचा अर्थ आहे तुमच्या जीवनातिल कोणी मित्र,कोणी सहायक ,कोणी नौकर ,कोणी शिष्य ,कोणी follower,असे कोणी जे फक्त तुमचेच ऐकतो, तुमचे कोणी हितचिंतक .....ज्या गुरु वर भैरवाची कृपा असते त्यांना पूर्ण समर्पित शिष्य भेटतात .
ज्या सेनापती अथवा राजा वर भैरव प्रसन्न असतात त्यांना प्राणाची आहुती देणारे सैनिक मिळतात .ज्या नेत्यावर भैरव कृपा करतात त्यांना पण समर्पित कार्यकर्ता मिळतात ,
ज्या अधिकारी वर भैरव तत्व खुश होतात त्यांच्या हाता खाली काम करत असलेले सदैव त्यांचं ऐकतात.
ज्या व्यक्ती भैरव तत्व मेहेरबान असेल तर त्यांचे मित्र त्या साठी काहीही करू शकतात.भैरव तत्व ने युक्त असलेले शिष्य आपल्या गुरु साठी जिवन देखील अर्पित करतात.
भैरव हे असे तत्व आहे जे तुमच्या साठी काहीही करण्यास तयार असतात.
जेव्हा सती ने दक्ष प्रजापती च्या यज्ञात स्वतः ला भसम् केले तेव्हा शिवजी क्रोधीत झालेत आणि त्यांच्या क्रोध अग्नितून वीरभद्र यांचा आविर्भाव झाला,विरभद्रांनी फक्त शिव शंकरा न साठी विष्णू सहित इतर देवतांशी युद्ध करून त्यांना पराजित केले.
काळभैरवांनी भोलेनाथांसाठी ब्रह्मा चे पाचवे मुख हि खंडित केले.
भैरव तत्व सैनिका मध्ये असते देशासाठी ते प्राणाचे हि बलिदान देतात.भैरव तत्व मुळेच क्रांतिकारी हसत हसत देशासाठी फासावर चढले,कारण भैरव तत्व स्वार्थी नसते ,आपल्या स्वामी साठी काहीही करण्यास धन्यता मानतात.भैरव आपले संरक्षक आहेत .ज्याच्या वर भैरव प्रसन्न त्याच्या केसाला हि हानी होत नाही.
म्हणून शिव च शक्ती साठी भैरव रुपात तत्पर आहे .सर्व शक्ती पिठा सोबत एक एक भैरव स्थापित आहे.
भैरव कृपे मुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना ,महाराणा प्रताप यांना त्यांच्या साठी जीव हि अर्पण करणारे असंख्य वीर मिळाले.भैरव कृपे मुळेच लोकमान्य टिळक ,नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एका हाकेवर देश सेवे साठी जाण कि बाजी भी लावायला तयार झाले,
जर तुमच्या जीवनात  कोणी असे आहे जे तुमच्या साठी काहीपण करण्यास तयार आहेत तर समजून घ्या,तुमच्या वर भैरव जी ची कृपा आहे.
कुत्रा हे भैरवजी चे वाहन आहे.कारण त्याच्या मध्ये भैरव तत्व आहे,म्हणून कुत्रा हा त्या मालक प्रति समर्पित असतो,एक निष्ठ असतो.म्हणून सांगतात कुत्र्याला पोळी टाका,तुमचे संकट टळतील.जर तुम्ही शत्रू बाधे पासून मुक्त होऊ इच्छिता ,जर तुम्ही कुण्या व्यक्ती मुळे सदैव पीडित होत असाल,पण त्याच्या विरुद्ध काही करू शकत नाही,तुम्ही स्वतः ला दुर्बल समजत असाल ,तुमच्या वर अशी वेळ आली असेल कि कुठेच मार्ग दिसत नाही आहे,तुम्हला कोणी मदत करत नाही असे वाटत असेल तेव्हा,तुम्हला वाटत असेल कि कोणी अदृश्य शक्ती सदैव तुमचे संरक्षन करावे तर निश्चितच तुम्ही भैरव साधना करून आपण निःशंक व्हा.
भैरव साधने मुळे राहू आणि शनी बाधा दूर होते यात तीळ मात्र हि शंका नाही.
तंत्रबाधा,दूषित शाप कर्म, सर्प बाधा यातून भैरव साधना तुमची मुक्ती करते.ऑफिस मधील पिडाकारक कोणी असेल,काही वेळा आपले पैसे कोणी घेऊन हि वापस देत नाही,जमीन,फ्लॅट,अडकला असेल तिथे हि भैरव उपासना श्रेष्ठ ठरते.
राहू महादशेत हि जातक बाधे ने त्रस्त होतो,नुकसान ,
आजारपण ,कोर्ट कचेरी यांनी दयनीय अवस्था होते तेव्हा भैरवनाथ तुम्हला यातून बाहेर काढतील.श्रद्धे ने करा फळ निश्चित मिळते.
भैरव तत्व मुळे च आपण सद्गुरू न प्रति समर्पित होतो.
भैरव साधना खूप प्राचीन काळापासून प्रचिलीत आहे.तंत्र क्षेत्रात खूप मान्यता आहे .
यांची साधना सात्विक, राजसिक,तामसिक तिन्ही पद्धतीने केली जाते.आपण गृहस्थ आहोत त्यामुळे सात्विक पद्धत अवलंबविली पाहिजे.रात्री याची उपासना श्रेष्ठ मानली जाते.
आपल्याला आत्मविश्वास वाढवायचा असेल,कोणी परिवारात व्यसन करत असेल,किंवा बाहेरील बाधेने त्रस्त असेल,मुलं कधी कधी वाईट संगतीत फसतात, परपुरुष ,परस्त्री रत होतात तेव्हा भैरव उपासने शिवाय पर्याय नाही.शास्त्रात भैरव कुळ 52 मानले जातात.प्रमुख अष्ट भैरव आहेत.
ग्रामीण भागात गावाच्या सीमेवर यांचे मंदिर असते त्याना बिरोबा,बहिरोबा,म्हणतात,
आपले जेजुरी हि भैरव शक्तीपीठ आहे खंडोबा हे मार्तंड भैरवच आहेत.राजस्थान सोबत उत्तर भारतात भैरवजी चे खूप रूप मिळतील.
शाबर मंत्रा मध्ये खूप सारे मंत्र मिळतील भैरवावर कारण नाथ परंपरेत भैरब साधना केली जाते.
बटुक भैरव आणि कालभैरव हे प्रसिद्ध भैरव आहेत.
उज्जैन येथे असलेले कालभैरव मंदिर जगविख्यात आहे,कारण तिथे भैरवनाथ साक्षात मदिरापान करतात,त्यांना दारू चा भोग लावला जातो,आणि तेही पितात हे सर्व बघतात.
नाथ परंपरेत भैरवास्त्र खूपच परिणाम कारक स्तोस्त्र आहे.
काशीचे कोतवाल हे कालभैरव च आहेत ,त्याच्या स्तुती साठी आद्य जगतगुरूंनी काळभैरवाष्ट्क लिहिले,
आज त्याची प्रचिती सर्व घेत आहेत.
दक्षिण भारतात भैरवाचे एक रुप आहे आकाशभैरव ..त्यांना शरभेश्वर म्हणतात.त्यांची साधना तंत्रात उच्चकोटी ची मानली जाते.त्यांची साधना दिव्य साधना आहे,भैरवांवर लिहिण्या साठी खूप आहे.
भक्तावर ते लवकर प्रसन्न होतात,म्हणून सर्वांनी नक्की त्यांची साधना करावी आणि अनुभव घायवे.
स्त्रिया ,कुमारी कन्या यांनी हि यांची साधना केली पाहिजे,
कारण त्यांना आज सुरक्षकतेची नितांत गरज आहे.
राहू, शनी बाधे साठी तर नक्की काळभैरवाष्ट्क वाचावे.
पोलीस खाते,संरक्षणखाते, incomeटॅक्स ऑफिसर, मोठे अधिकारी ,फौजी यांनी तर आवश्य करावी.
अष्टमुखी रुद्राक्ष त्यांचे प्रतीक आहे.कृष्ण पक्षतील अष्टमी तिथी ,आणि रविवार प्रिय आहे,
भैरव साधना सात्विक रूपात करावी ,विनाकारण कोणताच जटीलमार्ग वापरू नये.
शिवरूप भैरवाला शरण जा तो प्रयन्त शक्ती स्वरूप कळणार नाही
हनुमंत हि भैरव रूपच आहेत त्यांना हि शरण जाऊन
गुरु प्रति त्यांच्या सारखी एकनिष्टाता यावी या साठी प्रार्थना करा त्यामुळे भौतिक व अध्यात्मिक लाभ मिळतील
@मयुरेश विसपुते(रामानंदनाथ)
कृपया नावानुसार पोस्ट शेअर करा .कारण हा फक्त लेख नसून हि माझी बार्यच वर्षाची साधना आहे.
श्री शिवार्पणमस्तु
शिवशासणत: 
जय श्री कृष्णा
( टीप:- खाली दिलेला फोटो हा स्मशान भैरव जींचा आहे )

Previous
Next Post »

अंजनेय पर्वत. किश्किंदा दर्शन

अंजनेय पर्वत  यात्रा कर्नाटक राज्यामध्ये हम्पी या प्राचीन शहराच्या जवळ अंजनेय या नावाचा प्राचीन पर्वत आहे.  या ठिकाणी हनुमंताचा जन्म झाला अस...