।।खचू नका।।
।।भिऊ नका वेळ बदलेल, धीर सोडू नका।।
बोलण सोप असते. आज वेळ आली की असे सल्ले खूप जण देतात. तूम्ही जेव्हा अडचणीत असता , तेव्हा असे लोक भेटतात, ते तुम्ही कसे चूकला होता. हे ठासून सांगतात. पण. असे सल्ले देणाऱ्यांना महत्व देऊ नका. चूक तर होत असतेच. पण अशा निराशावादी सल्ला देणाऱ्या लोकांमूळे माणूस खचला जातो.
अर्थिक अडचण आली की, बाऊ करु नये. उत्पन्न कमी खर्च अधिक अशी अशस्था असते. तेव्हा चिडचीड होते. नवरा बायकों मधील भांडणे वाढतात. विशेषतः याच काळात खरी परिक्षा असते. नवऱ्याची नोकरी गेली. किंवा अर्थिक नुकसान झाले की, काही , बायका नवऱ्याला दोष देतात. त्यामूळे, अगोदरच नाऊमेद झालेला आपला नवरा अधिक हळवा बनतो, हि गोष्ट पत्नीच्या लक्षात येत नाही. पत्नी हिच नवऱ्याची ताकत असते. चूका सुधारण्याची संधी तर दिलीच पाहिजे.
वाढलेला खर्च कमी करण्यासाठी अनावश्यक असणाऱ्या बाबी लक्षात घ्याव्यात. उत्पन्न कमी झाले तरी, फोर व्हिलर मधून फिरुन अनेकजण अडचणीत येतात. खासगी कर्ज कधीच काढू नये कर्ज कधीच थांबत नाही. कर्जाची रक्कम ही सतत वाढत असते. तर उधारीवर वस्तू घेण्याची सवय ही घातक असते. उधारी वर मिळते म्हणून अनेकजण चैनीच्या वस्तू खरेदी करतात. त्यामूळे देणी वाढतात. देणेकऱ्याच्या त्रासामूळे मानसिक स्वस्थ्य बिघडते.
आपली आवक पाहून आपण नियोजन करावे. अनेक जण महागड्या फी असणाऱ्या शाळेत मूलाना शिक्षणासाठी प्रवेश घेतात. पण नंतर अडचणी सूरु होतात. उसनवारी करावी लागते. सण साधेपणाने साजरे करण्यात लाजू नये. कमी खर्चात मिळणार्या वस्तू घेणे काहीच गैर नसते. लोक तुम्हाला काय म्हणतील याचा विचार नकरता, सत्य स्विकारावे. कूणी मोठेपणासाठी हजारो रूपयांच्या देणग्या देतात. ईथे भाजी खरेदी करताना
घासागिस करणारे आम्ही मंदीरात हजारोच्या देणग्या देतो. खरेच देवाल देणगीची गरज आहे का? केवळ मोठेपणा साठी मूला मुलीच्या लग्नात कर्ज काढून खर्च करतो. पण अखेर कर्ज फेडताना होणारा त्रास तुम्हालाच सहन करायचा असतो. आलेले पाहूने निघून जातात , मग देणेकरी दारात बसतात. लग्न साधेपणाने केले तर लाखो रुपयाची बचत होऊ शकते. खुप तर दोघांच्या संसाराला उरलेले पैसे उपयोगी पडतिल. लग्नात आंदण, रुकवत देण्याची प्रथा ग्रामिण भागात आहे. बेड पासुन ते टिव्हि पर्यंत अनेक वस्तू दिल्या जातात. खरे तर या वस्तु घरात आधीच असतात. मग या ठेवायच्या कुठे हा प्रश्न पडतो. तर दिवाळी सणाला फटाके उडवून आनंद मिळतो असे वाटते हजारोच्या फटाक्यात राख एका तासात होते. हेच पैसै गरीबाच्या आजारपणासाठी देता येतील.
होऊ द्या खर्च । ही मानसिकता कधी बदणार. अडचणी आपणच तयार करतो. अनेकजण याची शिकार होतात. आणि जीवन निराशमय बनते. पण हि वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न का करत नाहीत लोक?,
जर कोण मित्र अडचणीत आलाच तर त्याला टोमणे मारण्या पेक्षा संकटात आधार द्या. उद्या तुम्हाला ही आधाराची गरज असेल. अपेक्षा रहित मदत केली तर हजारो हात पूढे येतील. सतत लोकांना अडचणी सांगू नका. सतत अडचणीतील लोकांना मदत करा.
हीच तुमची पुंजी आहे. डिपॉझीट आहे. पहा किती तरी अडचणी आल्या तरी तुम्ही सहज मात कराल.
मेडीटेशन करा, रोज एक सकारात्मक विचार सतत मनात घोळत रहा. पहा तुमचे सगळ जीवन बदलते आहे.दिवसे दिवस तुम्ही अधिक प्रगती करीत आहात.
शब्दांकनः
विजय टाकणे.
जेष्ठ पत्रकार.
9921494998.

ConversionConversion EmoticonEmoticon